पुणे: इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात व पेपर फुटीच्या घटना घडू नयेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षापासून प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक पाकीट विद्यार्थ्यांच्या समोर फोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक पाकिटात केवळ २५ प्रश्नपत्रिकाच असणार होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता कमी होणार आहे, असे राज्य मंडळाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
राज्य मंडळातर्फे येत्या मार्च-एप्रिलमध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे यंदा परीक्षा केंद्रांची संख्या तब्बल ३० हजार ९५४ पर्यंत वाढली आहे.
मुख्य परीक्षा केंद्रातून उपपरीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिकांची पाकिटे पोहोचवताना ती फोडली जाऊ शकतात. त्यामुळेच गोपनीयतेचा भाग म्हणून राज्य मंडळातून पाठवलेले प्रश्नपत्रिकेचे पाकीट थेट विद्यार्थ्यांसमोरच उघडले जाईल, यांची खबरदारी घेतली आहे.