कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 शनिवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परिक्षेसाठी सुमारे 19 हजार 200 परीक्षार्थी बसणार असून शहरातील महाविद्यालये व हायस्कूल अशा एकुण 62 उपकेंद्रावर परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.परिक्षेकरिता उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी त्यांचे मूळ ओळखपत्र (आधार कार्ड/पॅनक्रमांक/ फोटो) व प्रवेश प्रमाणपत्र झेरॉक्स प्रतिसह सोबत आणायचे आहे. कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उमेदवारांनी मास्क वापरणे व सॅनिटायझर जवळ ठेवणे अनिवार्य आहे.