शिवनेरी : फेब्रुवारी महिना उजाडताच शिवभक्तांना वेध लागतत ते शिवजयंतीचे याच पार्शवभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी येथे कोरोनामुळे मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीमध्येच हा सोहळा पार पडणार आहे.
परंपरेनुसार शिवाईदेवीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते तर त्यानंतर सकाळी 10 वाजता मंत्री गण यांच्या समवेत शिवजन्माचा पाळणा, पोलीस दलाकडून मानवंदना आणि शिवकुंज येथील इमारतीमध्ये बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन असे कार्यक्रम होणार आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे ते उपस्थित राहणा नाहीत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्या ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.