इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : खर्चीवाल्या कारखानदारांच्या मजूर वाढीबाबत आमदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात आयुक्त अनिल गुरव यांनी ट्रेडिंग धारक व कारखानदार यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली पण या बैठकीला ट्रेडिंग धारकाने पाठ फिरवल्याने ही बैठक फिसकटली.
वेगवेगळी कारणे सांगा ट्रेडींग धारक या बैठकीला न आल्याने कारखानदार संतप्त झाले व त्यांनी बैठकीचे योग्य नियोजन लावा व त्यांना नोटिसा पाठवा असे म्हटल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गुरुवर्यांनी सदर ट्रेडिंग
धारकांना लेखी स्वरूपात नोटिसा पाठविण्याचे काम सुरू केले. मंगळवार 22 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा याबाबत बैठक होणार आहे जर 22 सप्टेंबर रोजी आले नाही तर त्यांना पोलीस गाडीत घालून आणा असे मनसेचे नेते पुंडलिक जाधव यांनी सांगितले आजच्या बैठकीला शिवसेना जनता दल मनसे या नेत्यांबरोबर अनेक खर्ची वाले कारखानदार उपस्थित होते.