शिवजयंतीला शिवाजी पेठ मिरवणूक काढणारच

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.१९) प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणूक काढण्यावर बंदी असणार आहे.

मात्र, शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे शनिवारी परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी सांगितले. कोरोना संसर्ग कमी झालेला असल्यामुळे पेठेतील नागरिक तसेच शिवभक्त प्रशासनाचा आदेश मानण्याच्या मनस्थितीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिवजयंती उत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. याअंतर्गत शिवज्योत वाहण्यासाठी २०० जणांना व शिवजयंती उत्सवासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी असला तरी अजूनही प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत, गर्दीमुळे पुन्हा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. अनेक शिवप्रेमी शिवनेरी तसेच अन्य गड-किल्ल्यांवर जाऊन किंवा शहरात १८ तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात.