मुंबई: जेष्ठ गायक बप्पी लहरी यांचे मुंबईमध्ये निधन झाले आहे. ‘बप्पी दा’ या नावाने ते प्रचंड लोकप्रिय होते.
उडत्या चालीच्या भन्नाट गाण्यांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांनी 70-80 च्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपटांना संगीत दिले. त्यांची डिस्को डान्सर या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. वयाच्या ६९ वर्षी मुंबईत रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना झाला होता.