बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील खाटांगळे येथे ग्रामपंचायत 14 व 15 व्या वित्त आयोग तसेच आदर्श महिला बहुउद्देशीय संस्था पेठवडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योग प्रशिक्षण नुकतेच पार पडले .या उपक्रमात 100 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.यामध्ये ब्युटीपार्लर,फॅशन डिझायनिंग, रेगजीन कापडी पिशवी आदी कामांचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले , प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जि प सदस्य सुभाष सातपुते यांचे हस्ते देण्यात आले.
हा उपक्रम राबविले बद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन सातपुते यांनी केले.या उपक्रमात फक्त सहभाग न नोंदवता या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सीमा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने महिलांना शिलाई मशीन पुरवठा करावा अशी मागणी केली .यावेळी सरपंच सतिश नाईक, उपसरपंच एकनाथ पाटील,ग्रा.प.सदस्या रेश्मा पाटील,रूपाली परीट,ग्रामसेविका मुल्लाणी, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.