राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्यावतीने अंधांसाठी सहलीचे आयोजन

कोल्हापूर : राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा कोल्हापूर ही संघटना अंधांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे कार्यकर्ते त्याचबरोबर अंध व्यक्तींच्या कलाकौशल्य कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करते.

कोल्हापूर जिल्हा शाखेची निर्मिती झाल्यापासून पासून जिल्ह्यातील सभासदांसाठी सहलीचे दरवर्षी विविध ठिकाणी आयोजन केले जाते सदर ची यावर्षीची सहल शेगाव याठिकाणी जात आहे. सदरच्या सहलीमध्ये सभासदांना अध सभासदांचा सहभाग आहे या सहलीला शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर अध शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री वसंत सुतार, कोल्हापूर प्रेस क्लबचे माजी उपाध्यक्ष समीर मुजावर, जीवदान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अरुण खोडवे, व अक्षय बागडे उपस्थित होते.

या सहलीला दीपक वडा सेंटर, राजाभाऊ भेळ, यश बेकरी तसेच आमदार ऋतुराज पाटील, हसन मुश्रीफ, स्वर्गीय चंद्रकांत जाधव, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोल्हापूर जिल्हा शाखेचे पदाधिकारी अध्यक्ष संतोष परिट, उपाध्यक्ष श्री अमोल कुंभार, महासचिव शरद पाटील, कोषाध्यक्ष रघुनाथ खोत व सर्व कमिटी मेंबर पुणे विभागीय शाखेचे कार्यकारणी सदस्य अभिजीत खामकर व रवी कांबळे संतकुमार कांबळे उपस्थित होते.