गडहिंग्लज मध्ये कर्नाटक बसला प्रवेश नाकारला

गडहिंग्लज: गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षा असणाऱ्या कर्नाटक बसचे आज गडहिंग्लज बसस्थानका मध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास आगमन झाले होते. हि बस गडहिंग्लज – संकेश्वर अशी होती. पण आज दुपारी हि बस गडहिंग्लज बस स्थानक येथे येताच आगारप्रमुख संजय चव्हाण यांनी हि बस अडवली असता त्या बस चालकाने आम्हाला महाराष्ट्रात येण्या साठी परवानगी मिळाली असल्याचे सांगितले. तसेच संकेश्वर आगार प्रमुख यांच्याशी देखील बोला असे सांगितले.पण गडहिंग्लज आगार प्रमुखांनी त्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला.

कर्नाटक बसला का बाहेर काढले याची विचारणा करण्यासाठी वरिष्ठ पत्रकार रावसाहेब यादव व लोकल ऍप प्रतिनिधीने आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता आगार व्यवस्थापक म्हणाले कर्नाटक महामंडळाच्या बसेस ह्या अगदी मुंबई पर्यंत जाऊन वाहतूक करत आहेत. पण आम्हाला कर्नाटक हद्दीत येऊ देत नाहीत या साठी आरटी- पीसीआर, दोन डोस घेतल्याचा पुरावा याची मागणी केली जाते. तसेच संकेश्वर आगार व्यवस्थापक तोंडी सांगतात तुम्ही आमच्या हद्दीत या पण लेखी परवानगी देत नाहीत. म्हणून आम्ही आज त्यांच्या गाडीला प्रवेश नाकारला आहे.कर्नाटक सरकारच्या ह्या आडमुठ्या भूमिकेमुळे मात्र सीमाभागातील जनतेचे मात्र चांगलेच आर्थिक हाल होत असून दोन्ही राज्यांनी एकमेकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.