कोल्हापूर : कोल्हापुरातून रेल्वेने थेट गुवाहाटी (आसाम) येथे जाता येणार आहे.रेल्वे विभागाकडून दि. १२ एप्रिलपासून कोल्हापूर – गुवाहाटी एक्स्प्रेसची सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.हॉलिडे स्पेशल म्हणून दि. ७ जूनपर्यंत कोल्हापूर – गुवाहाटी एक्स्प्रेसच्या नऊ फेऱ्या होणार आहेत.
आठवड्यातील दर मंगळवारी कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी रेल्वे सुटणार आहे. त्यानंतर ती सकाळी सहा वाजता मिरजमधून गुवाहाटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.ही रेल्वे शुक्रवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. त्यादिवशी सायंकाळी पावणेसहा वाजता निघणारी रेल्वे कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे.