सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खूनप्रकरणातील हल्लेखोर गजाआड

इचलकरंजी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे (वय 55, रा स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा काल, मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. या खूनप्रकरणातील हल्लेखोराला पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केले आहे.

अवघ्या बारा तासांत शिवाजीनगर पोलिसांनी श्रवण कुमार श्यामसुंदर दायमा (वय ३३, रा. स्वामी अपार्टमेंट) याला अटक केली. व्यक्तिगत कारणातून त्याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. व्यक्तीगत कारणातून खून झाल्याचे उघडकीस आले असले तरी अद्याप नेमके कारण समजू शकले नाही. ताब्यात घेतलेल्या श्रवण दायमा याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.