जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या अंतर्गत असणाऱ्या क्रीडा स्पर्धांचा आज (मंगळवार) पासून प्रारंभ झाला. या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा घेणेत आल्या.

स्पर्धेचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या हस्ते करणेत आले. उदघाटन सामना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) अरुण जाधव यांच्यामध्ये घेणेत आला. कॅरम स्पर्धे साठी 32 महिला व पुरुष 108 व बुदधीबळ स्पर्धेस 18 महिला व 60 पुरुष यांनी सहभाग नोंदविला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कॅरम स्पर्धेसाठी पंच म्हणून म्हणून उदय गोडवे, शंकर चव्हाण, दत्ता निकम, सुशांत सुर्यवंशी व बुदधीबळ स्पर्धेसाठी अनुज चेस अकॅडमीचे बाबुराव पाटील, बी.के.मंगल व प्रसाद बोरकर यांनी पाहिले.