कोल्हापूर परिते गारगोटी रस्त्याचे काम 7 फेब्रुवारी पासून सुरू होणार

कोल्हापूर: सुमारे तीन वर्ष रखडलेल्या कोल्हापूर परिते गारगोटी या राज्य मार्गाचे काम 7 एप्रिल पासून सुरु करण्यात येणार असून मे महिन्यापर्यत तो पूर्ण केला जाणार आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आ. पी. एन. पाटील सडोलीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली.

कोल्हापूर परिते गारगोटी हा राज्य मार्ग रुंदीकरणास डांबरीकरण पूर्व मोऱ्या बांधण्याचे काम हायब्रीड अँन्युएटी अंतर्गत तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. एकूण 77.42 किलोमीटर्सच्या या मार्गासाठी 221.97 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या रस्त्याचे काम फेब्रुवारी 2021 अखेर पूर्ण करावयाचे होते. मात्र सुरू झालेले काम तीन वर्षे रखडले आहे. प्रवासी वाहन धारकांची मोठी अडचण होत होतीं मध्यंतरी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत आ. पी एन पाटील यांनी आग्रही भूमिका घेत या रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास अधिकाऱ्यांना निलंबित करावे असा आग्रह धरला होता. त्यानुसार निर्णय झाला होता. आमदार पाटील यांच्या रूद्रावतारा मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. आज आ.पाटील यांच्या आग्रहामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आ.पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत या रस्त्याबाबत बैठक झाली. यावेळी या रस्त्याच्या प्रत्यक्ष डांबरीकरणाला दिनांक सात फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाणार असून मे महिन्यापर्यंत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात यावे असा निर्णय झाला.यावेळी जिल्हाधिकारी श्री.राहूल रेखावार, सार्वजनिक बांधकाम मंडळ अधिक्षक अभियंता एस. पी.कुंभार, कार्यकारी अभियंता पी.आर.जाधव, उप कार्यकारी अभियंता दिपक मिरजकर,शिवाजी कवठेकर इतर अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.