डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने होणार स्थलांतरीत

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि वादाचा विषय ठरलेला धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतराचा मुद्दा अखेर संपुष्टात आला आहे. राज्य सरकारने डोंबिवलीतील असे तब्बल १५६ रासायनिक कारखाने दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक अशा कारखान्यांचा यात समावेश आहे.दरम्यान, डोंबिवलीतील हे १५६ कारखाने पाताळगंगा परिसरात हलवण्याच येणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीतील औद्योगित वसाहतीला भेट दिल्यानंतर इथल्या घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर झालेल्या पाहणीमध्ये १५६ कारखाने धोकादायक आणि अतिधोकादायक असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार हे कारखाने इतरत्र हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.