खुपिरेच्या बलभीम विकास संस्थेत सत्ताधारी बलभीम पॅनेल विजयी

कुडित्रे: खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी बलभीम शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १७ जागा मिळवून विजय संपादन केला. रविवारी निवडणुकीसाठी मतदान होऊन सायंकाळी मतमोजणी झाली.

संस्थेच्या १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते रविवारी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत मतदान झाले सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. यामध्ये बलभीम शेतकरी विकास पॅनेलने १७ जागा जिंकून बाजी मारली.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी – सर्वसाधारण गट : आनंदा चौगुले (३९२), सर्जेराव चौगुले(४०६), नारायण जगदाळे (३८९), दिनकर जांभळे (३७३), अर्जुन पाटील (४०४), अशोक पाटील (३८०), जितेंद्र पाटील (३७४), तानाजी पाटील (४०८),बबन पाटील (३७०), युवराज पाटील (३५२), विष्णू पाटील (३५९), श्रेयस पाटील (३७८), महिला गट : आनंदी पाटील (४११), शशिकला पाटील (३४३), इतर मागासवर्गीय गट – शहाजी कुंभार (३९७), अनुसूचित जाती जमाती गट : गौतम कांबळे (४०२), भटक्या जाती जमाती गट : रंगराव हराळे (३९२).

बलभीम विकास संस्थेवर कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील यांची सत्ता आहे. गेली दोन वर्षे संस्थेवर प्रशासक होते विरोधी गटाने सात संचालक थकबाकीदार असल्यावरून सहकार निबंधकाकडे तक्रार केली होती. २०२० मध्ये सहकार निबंधक आणि सात संचालक अपात्र झाल्याने संचालक मंडळ बरखास्त केले होते. संस्थेची आर्थिक उलाढाल सुमारे साडेआठ कोटी रुपये आहे अडत, धान्य, गिरण विभाग, तीन शाखा, मुख्यालय असे विभाग आहेत. अडत विभागांमध्ये सत्ताधाऱ्यांनी नियमबाह्य कारभार केल्याचा विरोधकांचा आरोप होता. त्याची पाच वर्षाची फेरतपासणी झाली. यामध्ये गुळ अडव्हान्स वाटप केलेले ११३ सभासदांना दोषी ठरवले. तसेच २७९ वाढीव सभासदांपैकी १७७ सभासदांच्या नावावर शेतजमीन नसल्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द केले. निवडणुकीत सत्ताधारी बलभीम शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील यांनी केले. विरोधी बलभीम बचाव परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व सरदार बंगे, सनी पाटील, प्रकाश चौगले यांनी केले. सहकार निबंधक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी काम पाहिले.