
देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ उभारण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी ट्विट करत म्हंटल की, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत.देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ १४ हजार ८०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला आहे. जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील पंचवीस वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे, तर मच्छल बटालियनचे कर्नल प्रणव पवार यांनी सदर मच्छल या ठिकाणी स्थापित केला आहे.देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सदैव प्रेरणादायी ठरेल. सर्व जवानांना माझा सलाम! जय शिवराय असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं