नाना पटोले यांच्या बेताल वक्तवयाचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध व गुन्हा दाखल करण्याची मागणी

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : भारतीय जनता युवा मोर्चा इचलकरंजी व वडगाव मंडलाच्या वतीने कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या बेताल वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काल साकोली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मी मोदींनाही मारू शकतो असे वक्तव्य केले असून हा देशाचा अपमान असून त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांच्या या वक्तव्याचा भारतीय जनता युवा मोर्चा तीव्र शब्दता निषेध करत आहे. यापूर्वीही पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने पंतप्रधानाच्या सुरक्षेमध्ये जाणूनबुजून चूक केली होती त्यावेळीही देशाच्या गृहमंत्री यांच्याब्द्द्ल वाच्याळ वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. वारंवार देशद्रोहाचे वक्तव्य करणारे पटोले यांचा पंजाबमधील घडलेल्या घटनेमागे यांचा हात आहे का याची चौकशी व्हावी व त्यांचावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराव. अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तीव्र आंदोलन करणार असलेचे निवेदन शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद माने, इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, शहर सरचिटणीस अरविंद शर्मा, युवा सरचिटणीस अरविंद चौगुले, सुजय पवार, युवती सहसंयोजिका उमा ठिगळे, गीतांजली राजमाने, मनोज तराळ, विशाल माने, हेमंत वरुटे, प्रवीण बनसोडे, सुधाकर हेब्बाळे, सतीश लाड, तुषार टेकाळे, प्रवीण रांगोळे, शिवाजी पुजारी, अर्जुन शिंदे, उमेश गोरे, प्रवीण रावळ, रामसागर पोटे, पूजा सूर्यवंशी, स्वाती फातले, दिया फातले, प्रियंका डोईफोडे आदि युवा पदाधिकारी उपस्थित होते.