आधारभूत दरातून तरी दिलासा मिळावा ……..द्राक्ष उत्पादक संघाची भूमिका

सोलापूर : राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा केवळ निसर्गाच्या लहरीपणाचाच सामना करावा लागलेला आहे. आता किमान आधारभूत दरातून तरी दिलासा मिळावा ही भूमिका द्राक्ष उत्पादक संघानी घेतलेली आहे.

द्राक्षच्या वाणानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. याची सुरवात नाशिक येथे झाली असून आता विभागनिहाय हा निर्णय होत आहे. यापूर्वी नाशिक, सांगली या ठिकाणी द्राक्ष आणि बेदाण्याचे दर ठरलेले आहेत. आता सोलापूर विभागातील उस्मानाबाद, पंढरपूसाठीही दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भात पंढरपूर येथे बैठक पार पडली असून जे बैठकीत ठरले तोच दर शेतकऱ्यांनी कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. द्राक्ष आणि बेदाण्याचे दर हे 10 टक्के इतक्या झालेल्या खर्चावर नफा ठेऊन दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे किमान झालेला खर्च निघून चार पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

मात्र, यामध्ये बदल झाला तर सर्वकाही व्यर्थ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकी दाखवत हा निर्णय यशस्वी करुन दाखवण्याचे आवाहान संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केले आहे.यामुळे घेतला जातोय हा निर्णयवर्षभर परीश्रम आणि उत्पादनावर खर्च करुनही शेतकऱ्यांना द्राक्ष पिकातून फारसा नफा मिळत नाही. शिवाय गेल्या तीन वर्षापासून तर निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान अधिक अन् उत्पन्न कमी अशी अवस्था राहिलेली आहे. द्राक्ष छाटणीला आले की व्यापारी वाटेल त्या किंमतीने मागणी करतात. शिवाय शेतकरीही वेगवेगळे दर ठरवून देतात. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नच शेतकऱ्यांना मिळत नव्हते. त्यामुळे यंदा प्रथमच हा प्रयोग नाशिक संघानेन राबवला होता. त्यानंतर सांगली आणि आता सोलापूर विभागाने हा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.