अभिनेते निळू फुले यांच्यावर लवकरच येणार बायोपिक

मुंबई वृत्तसंस्था : दिवंगत मराठी अभितेने निळू फुले यांची बायोपिक लवकरच येणार आहे. कुमार तौरानी या बायोपिकवर काम करणार असून याच वर्षी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. कुमार तौरानी यांनी निळू फुले यांची लेक गार्गीकडून या चित्रपटासाठीचे राईट्स देखील घेतले आहेत.

याबद्दल बोलताना कुमार तौरानी म्हणाले की, होय, आम्ही त्यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून निळू फुले यांच्यावर बायोपिक बनवण्याचे अधिकार घेतले आहेत. एवढचं काय तर या वर्षीच या प्रोजेक्टवर काम सुरू करण्याचा विचार करत आहोत. या चित्रपटात कोणाला कास्ट करणार हे त्यांनी अजुन काही उघडपणे सांगितले नाही. चित्रपटाच्या कथे विषयी सांगायचं तर, या बायोपिकमध्ये निळू हे एक अभिनेता स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला त्यांचे जीवन कसे होते ते पाहायला मिळणार आहे.

चित्रपटसृष्टीतल एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळख असणाऱ्या निळू फुले यांनी २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या मराठी नाटकातून त्यांनी आपल्या त्यांच्या करिअरची सुरुवात केली. १९५६ मध्ये आलेल्या ‘एक गाव बारा भानगडी’पासून सुरू झालेल्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. निळू यांनी ‘कुली’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, ‘मशाल’मध्ये दिलीप कुमार आणि ‘सारांश’मध्ये अनुपम खेर यांच्यासोबत हिंदी चित्रपटातही काम केले आहे. ते पडद्यावरच्या खलनायकी भूमिकेसाठी ओळखला जात होते. वास्तविक जीवनात त्यांनी समाजाच्या भल्यासाठी कामे केली. निळू फुले यांचे २००७ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.