राजर्षि शाहू गव्हर्मेंट बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी दिलीप मिरजे, विनायक कांबळे यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : राजर्षि शाहू गव्हर्मेंट बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप मिरजे, तसेच पाटबंधारे विभागाचे विनायक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी त्याबाबतचे पत्र नुकतेच प्रदान केले.

बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी प्रास्ताविकामध्ये संचालकांची ओळख करून देऊन संचालक दिलीप मिरजे यांच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व विनायक कांबळे यांच्या पाटबंधारे विभागाअंतर्गत तसेच बँकेच्याप्रती असणाऱ्या स्नेहाचा उल्लेख करून त्यांच्या अभ्यासूवृत्तीचा बँकेच्या प्रगतीस हातभार लागणार असल्याचे सांगितले. यावेळी नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालक यांचा सत्कार रवींद्र पंदारे, उपाध्यक्ष संजय खोत यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन केला. निवडीनंतर मिरजे व कांबळे यांनी बँकेच्या कामकाजाची संधी प्राप्त करून दिल्याबदल सर्व संचालक मंडळाचे आभार मानून बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

या सत्कार समारंभावेळी संचालक शशिकांत तिवले, मधुकर पाटील, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, संचालक किशोर पोवार, अरविंद आयरे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते.