मराठा आरक्षण बाबत विनोद पाटील यांच्या पुनर्विचार याचिकेवर ‘या दिवशी ‘ होणार सुनावणी….

मुंबई: मराठी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला आहे. विनोद पाटील यांच्याकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या १२ जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. मात्र आता विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १२ जानेवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल, ते राज्य सरकारने करावे, असे विनोद पाटील म्हणाले आहेत. राज्यात ओबीसी आरक्षणावरून मुद्दा पेटला आहे तर आता मराठा आरक्षणासाठी विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर १२ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे अपेक्षित आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.