‘हे’ आहेत जिल्हा बँकेचे विजयी उमेदवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठ्या ईर्षेने आणि ताकतीने प्रचार झाला. मतदानही चुरशीने झाले. महाविकास आघाडीत फूट पडल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते. जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक झाली. या २१  संचालकांपैकी ६ संचालक बिनविरोध निवडून आले. यामध्ये जवळपास सर्व नेतेच बिनविरोध निवडून आले.

बँकेचा सन २०२१-२०२६ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले संचालक असे आहेत. विकास सेवा संस्था गटातून कागल मधून नामदार हसन मुश्रीफ, गगनबावडा नामदार सतेज पाटील, करवीर आमदार पी. एन. पाटील, चंदगड आमदार राजेश पाटील, हातकणंगले माजी आमदार अमल महाडिक,  राधानगरी मधून ए. वाय. पाटील हे ६ संचालक यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १५ जागांचा आज निकाल जाहीर झाला.

जिल्हा बँकेत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :

विकास सेवा संस्था गट : सुधिर देसाई, रणवीरसिंह गायकवाड, राजेंद्र पाटील-यड्रावकर, रणजीत पाटील, संतोष पाटील, विनय कोरे

कृषी पनन गट : संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील

नागरी बँक पतसंस्था गट : अर्जुन आबिटकर

इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट : प्रताप उर्फ भैय्या माने

महिला प्रतिनिधी गट : श्रुतिका काटकर, निवेदिता माने

इतर मागासवर्गीय गट : विजयसिंह माने

अनुसूचित जाती गट : राजू बाबा आवळे

विमुक्त जाती जमाती गट : स्मिता गवळी