कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात झालेल्या हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूरमधील कळंबा कारागृह वारंवार कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे चर्चेत राहत असते. आता कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक म्हणजे या घटनेत एका कैद्याचा मृत्यू झाला असल्याचेही सांगण्यात येत आहे. निशिकांत बाबुराव कांबळे असे या घटनेत मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.

मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार निशिकांत आणि चार कैद्यांमधील वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली. हाणामारीत निशिकांतला बेदम मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.