विद्यार्थ्यांनी न घाबरता कोव्हीड लस घ्यावी : जि. प. सदस्य विनय पाटील

राशिवडे प्रतिनिधी : संदीप लाड

राशिवडे : कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता कोरोना लस घ्यावी असे आव्हाहन राशिवडे जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी केले. राशिवडे बु ( ता. राधानगरी ) येथील श्री. नागेश्वर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज मधील विद्यार्थ्यांना लसीकरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एस. पाटील होते. विनय पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये जावून लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे या मोहिमेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यासाठी न घाबरता लसीकरणास प्रतिसाद द्यावा असे आव्हाहन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी हाक्के यांनी कोव्हीड लस घेणे का आवश्यक आहे तसेच लस घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. नागेश्व्रर कॉलेज मधील अकरावी आर्ट्स आणि सायन्स मधील सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी लसीकरण करण्यात आले. तसेच हायस्कूल मधील इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. लसीकरण पूर्ण करण्यासाठी राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, आशावर्कर तसेच शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एस. एल. चौगले यांनी केले तर आभार एम. एस. सुतार यांनी मानले.