मुंबई मनपाकडून तिप्पट ऑक्सिजन पुरवठ्याची तयारी

मुंबई :कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहेत. त्यातच मुंबईत दाखल होत असलेल्या दोन टक्के रूग्णांनाच सध्या ऑक्सिजनची गरज भासते आहे. मात्र भविष्यात ही मागणी वाढण्याची भीती आहे त्यामुळे मनपाने तिप्पट पुरवठ्याची तयारी केली आहे.

कोरोना लक्षणे असलेले आणि रूग्णालयात दाखल कोविड रूग्ण पाचव्या दिवसीच बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रोज कोरोनामुक्त होणाऱ्याचे प्रमाणही मोठं आहे. प्रभावी लसीकरणामुळे मुंबईतली स्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊनची नाही मात्र निर्बंध कडक असू शकतात, असे संकेत काल आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर हे निर्बंध लागू केले जाऊ शकतात.