राज्यातील निर्बंधांबाबत आज निर्णय…….

मुंबई : राज्यात ओमायक्रॉन हातपाय पसरत असतानाच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ होत आहे.  राज्यात काल 10 हजार पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने राज्यात नव्याने निर्बंध लावण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसे नवे आदेश लागू करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोरोनाच्या नव्या राज्यव्यापी निर्बंधांबाबत आज निर्णय घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर राज्यासाठी नवे आदेश लागू करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री अजित पवार यांचा होकार आल्यावर नवे निर्बंध लावणार आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाविद्यालये बंद करावीत, अशी भूमिका कुलगुरूंनी मांडल्याची माहिती आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. यात महाविद्यालये बंद करण्याच्या बाजूने सूर लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.