कोल्हापूरात आज एक दिवसात ३ ओमायक्रॉन पॉझिटिव्ह …..

कोल्हापूर: आज एका दिवसात कोल्हापूर शहरात 3 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.यामध्ये सुर्वेनगर ( कळंबा ),नागाळा पार्क, व शहर परिसरात रूग्ण समावेश आहे.

काल पॉझिटिव्ह आलेल्या नागाळा पार्क येथील ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.याच गतीने रुग्ण वाढ होत राहिली तर दुसऱ्या लाटेप्रमाणे रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. यापूर्वी कळंबा हनुमान नगर ,नागाळा पार्क येथे रुग्ण सापडले होते.आत्तापर्यंत कोल्हापूरची ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 5 झाली आहे.