कोविड काळजी केंद्र म्हणून महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयास मान्यता

वर्धा : ओमायक्रॉन लाटेच्या पार्श्वभूमीवर सावंगी येथील महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय संशोधन केंद्रास कोविड काळजी केंद्र म्हणून मान्यता मिळाली असून विदर्भातील ते पहिले केंद्र ठरले आहे.

गत काही दिवसांपासून ओमायक्रॉन व तत्सम स्वरूपातील रुग्ण आढळून येत आहे. त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय शासनाकडून राबविल्या जात आहे. शासकीय तसेच खासगी कोविड काळजी केंद्र अग्रक्रमाने सुरू केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठाच्या महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयास काळजी केंद्र म्हणुन तत्परतेने मान्यता दिली. संस्थेची इमारत अधिग्रहित करून सशुल्क उपचार सुरू होणार आहे. त्यासाठी प्रती रुग्ण प्रती दिवस दीड हजार रुपये आकारल्या जातील. शासनाकडून संस्थेला कोणतेही अनुदान मिळणार नाही. या शुल्कात खाट, भोजन, डॉक्टर सल्ला व शुश्रुषा तसेच उपचार मिळतील. आरोग्य यंत्रणेकडून शिफारस करण्यात आलेल्या रुग्णांनाच येथे दाखल करून घेणे बंधनकारक आहे.

या रुग्णालयाची क्षमता २४४ रुग्ण खाटांची असून विदर्भातील एवढय़ा मोठया क्षमतेचे हे पहिले कोविड काळजी केंद्र ठरणार. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.उदय मेघे म्हणाले की, रुग्णालयात कोविड विषयक सुविधा पुर्वीपासूनच आहेत. दुसऱ्या लाटेतही रुग्णालयाने जबाबदारी स्वीकारली होती. आयुर्वेदचे काही रुग्ण अन्य इमारतीत या वेळी स्थलांतरित करावे लागतील.संस्थेची इमारत अधिग्रहित करून सशुल्क उपचार सुरू होणार आहे. त्यासाठी प्रती रुग्ण प्रती दिवस दीड हजार रुपये आकारल्या जातील. शासनाकडून संस्थेला कोणतेही अनुदान मिळणार नाही. या शुल्कात खाट, भोजन, डॉक्टर सल्ला व शुश्रुषा तसेच उपचार मिळतील. आरोग्य यंत्रणेकडून शिफारस करण्यात आलेल्या रुग्णांनाच येथे दाखल करून घेणे बंधनकारक आहे. या रुग्णालयाची क्षमता २४४ रुग्ण खाटांची असून विदर्भातील एवढय़ा मोठया क्षमतेचे हे पहिले कोविड काळजी केंद्र ठरणार. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.उदय मेघे म्हणाले की, रुग्णालयात कोविड विषयक सुविधा पुर्वीपासूनच आहेत. दुसऱ्या लाटेतही रुग्णालयाने जबाबदारी स्वीकारली होती. आयुर्वेदचे काही रुग्ण अन्य इमारतीत या वेळी स्थलांतरित करावे लागतील.