“संकल्प आमचा थुंकी मुक्त शाहूनगरीचा”

कोल्हापूर : गुटका मावा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने कॅन्सर सारख्या आजाराला तोंड द्यावे लागते. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे हवेतून पसरणारे कोरोना टीबी स्वाईन फ्लू हे श्वसन संस्थेशी संबंधित आजार वेगाने पसरतात, त्यामुळे याबाबतचे गेले दीड वर्षापासून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळीने प्रबोधन व कारवाईसाठी कोल्हापुरात कंबर कसली आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर आज चळवळी मार्फत तारा राणी चौक येथे कार्यकर्त्यांनी प्रबोधन केले .

“थुंकी मुक्त कोल्हापूर निरोगी कोल्हापूर”, थुंकीचंद गो बॅक” आमची शाहूनगरी स्वच्छ आणि निरोगी” भावा हे कोल्हापूर हाय, इथे थुंकायला परवानगी नाही “फलक घेऊन अशा अनेक घोषणा देत आज परिसर दुमदुमून गेला. थुंकणारी व्यक्ती आढळल्यास तिच्यावर शहर वाहतूक पोलिसांकडून दंड केला गेला.

तसेच सार्वजनिक स्वच्छता करण्यास भाग पाडले. साथ रोगाच्या या काळात प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही आवश्यक ती कठोर कारवाई व त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे अशी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

लोकांमध्ये सार्वजनिक स्वच्छते करता स्वयंशिस्त शिकवण्याचे धडे देण्याचा या वर्षाचा संकल्प चळवळीने केला आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व राहुल राजशेखर, दीपा शिपूरकर, विजय धर्माधिकारी, अभिजित गुरव, नीना जोशी, ललिता गांधी ,फिरोज शेख यांनी केले. कॉम्रेड दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच अँटी स्पिटिंग चळवळीचे डॉ. देवेंद्र रासकर ,ललित गांधी,राजेंद्र यादव, राहुल चौधरी, सुधीर हंजे ,विद्याधर सोहोनी, महेश ढवळे, मोहन सातपुते, जयेश बिल्ले,अजय कुरणे,अनिल कांजर,अश्विनी पाटिल, शुभम ससाणे उपस्थीत होते.