आ.राहुल आवाडेंच्या उपस्थितीत एएवायएम जेपीएल डे-नाईट क्रिकेट मॅच या स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर: सकल जैन मारवाडी समाज तर्फे आयोजित एएवायएम जेपीएल डे-नाईट क्रिकेट मॅच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत नामदेव भवन, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे पार पडला.  …

शौमिका महाडिक यांच्या हस्ते शिरोली येथे नाभिक समाजाच्या सभागृह बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने नाभिक समाजासाठी सामाजिक सभागृह उभारण्यात येत आहे. या सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमीका महाडिक हस्ते करण्यात आले आहे.   समाजातील प्रत्येक…

जवाहर सहकारी साखर कारखाना ‘विकास कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात 

कुंभोज  ( विनोद शिंगे) सहकार भारती आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेती विकास कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळे मध्ये…

आ.अमल महाडिक यांच्या हस्ते नरंदे येथे एक कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ

कुंभोज  (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे आ.अमल महाडिक यांच्या निधीतून होत असलेल्या १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.     राजकुमार भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून गावाला…

शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत शिरोली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सार्वजनिक सभागृह कामाचा शुभारंभ

कुंभोज  ( विनोद शिंगे) पुलाची शिरोली गावातील शिरोली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सार्वजनिक सभागृह उभारण्यात येत आहे. या सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमीका महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाले. सोसायटी…

सत्यजित कदम यांनी मनपा आयुक्तांना नागरिकांच्या समस्येबाबत चर्चा केली

कोल्हापूर – शिवसेना नेते सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून नागरिकांच्या विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी दरवर्षी मार्च अखेरीस देण्यात येणारी ५०%…

खासगी सावकारांवर कारवाई करा ;आकुर्डेतील पाटील कुटुंबाची मागणी

कोल्हापूर – शाळकरी मुलाला पळवून नेऊन जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या खासगी सावकारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील सरदार पाटील यांनी कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.…

मंत्री आबिटकरांच्या हस्ते भुदरगड तालुक्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना इ. योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान कार्यक्रम मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  …

कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरूवात

कोल्हापूर:कोल्हापूरशहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्त सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत.    या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ भोसलेवाडी कदमवाडी मध्ये योगेश पाटील घर ते मंडलिक घर रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेवक संजय निकम, चंद्रकांत घाडगे, वैभव माने, उमेश माने, धीरज पाटील, किशोर पवार, प्रवीण वाघमारे, सोनल वाघमारे, पंकज किडगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराच्या विकासासाठी कटीबध्द असून शहराला पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात कमी पडणार नाही, अशी ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली. त्यानंतर प्रभाग क्रमांक ४५ अंतर्गत कैलासगडची स्वारी परिसरात मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम पासून ते पद्मावती चौकापर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम नगरोत्थान महाअभियानांतर्गत २० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभही कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला संतोष महाडिक, अभिजीत पाटील, प्रसाद जाधव, संपत जाधव, उदय पाटील, निवास शिंदे, बाळासाहेब पाटील, मिलिंद गुरव कुणाल शिंदे, युवराज कुरणे, आर्यनील जाधव, आणि श्रीधर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणं प्रभाग क्रमांक ७, सदर बाजार परिसरातील अग्निहोत्री घर ते ईगल पाईप रस्ता, कापसे कॉलनी मार्गाचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी संजय निकम, सुनील नाणिवडेकर, महावीर मंगदुम, अ‍ॅड. डी. बी. कापसे, एन.जी. पाटील आणि अजिंक्य तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रभाग क्रमांक ६२ बुध्द गार्डन परिसरातील आयडीयल सोसायटीमध्ये अशोक साळोखे यांच्या घरापासून ते रेसिडेन्सि मित्र मंडळापर्यंतच्या मार्गावर गटार बांधकामासाठी २० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. त्याचीही सुरूवात कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली. या शुभारंभ वेळी रणजित कांबळे, रविकिरण गवळी, प्रेम रजपुत, मोहन जाधव, मंगलताई निपाणीकर, राजू खडके, जय खडके, सुनिल देशपांडे, सनी आवळे, महेश खडके, महेश जाधव, अभि सावंत, प्रभूराज भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कुसुम ऑलिम्पियाड इचलकरंजी या नवीन वास्तूचे उद्घाटन-आ. राहुल आवाडे

कुंभोज (विनोद शिंगे) कुसुमताई बाल व प्राथमिक विद्या मंदिर, इचलकरंजी आणि मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या अंतर्गत उभारलेल्या कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी या नवीन वास्तूचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात…

🤙 8080365706