एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या विपणन सहकार्यामुळे ‘चेतना’च्या उत्पादनांची ४ दिवसांत ४२ हजारांची विक्री

कोल्हापूर: समाजातील सक्षम नागरिकांनी अक्षम नागरिकांना सहकार्याचा हात पुढे केला, तर सामाजिक-आर्थिक विषमता दूर होण्याबरोबरच सामाजिक सौहार्द प्रस्थापित होण्यासही मदत होते, याचे बोलके उदाहरण शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.…

इंडियन कॉमर्स असोसिएशनकडून डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचा फेलो म्हणून सन्मान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना त्यांच्या वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाबद्दल इंडियन कॉमर्स असोसिएशनने फेलो म्हणून सन्मानित केले आहे. उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ७५ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेत गुरू गोविंद जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. के. माथूर यांच्या हस्ते प्रा. महाजन यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात वाणिज्य व व्यवस्थापन विषयामध्ये केलेले अध्ययन, अध्यापन, संशोधन व विस्तारकार्य याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.     प्रा. महाजन यांनी अकौंटन्सी व फायनान्स या विषयांचे अध्यापन केले आहे. अकौंटन्सी, फायनान्स, उद्योजकता विकास, काजू प्रक्रिया व अन्न प्रक्रिया उद्योग, ग्रामीण व्यवस्थापन या विषयांवर संशोधन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद तसेच शिक्षण मंत्रालयाच्या इम्प्रेस या योजनेचे अनुदान त्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्राप्त झाले. उद्योजकता विकास व वित्तीय समावेशन या विषयावर हे संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. २० विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी.चे संशोधन पूर्ण केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिली आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठीय धोरण निर्मितीमध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अकौंटन्सी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न केले. कुलगुरू व प्र-कुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. ए. ऑनलाइन, बी. कॉम. (बी.एफ.एस.आय.) व बी. बी. ए. – एम. बी. ए. (इंटिग्रेटेड) असे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

‘गोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन उत्‍साहात

कोल्‍हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने वसुबारस दिनानिमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व इतर धार्मिक विधी संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या…

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंनी घेतली राहुल आवाडेंची भेट

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप भैया मोरे, राष्ट्रीय मीडिया प्रभारी अमनदीप सिंह, प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा महाराष्ट्र सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा अमृतजी…

चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांचा अर्ज दाखल

कोल्हापूर: इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आपला…

भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहाचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते शुभारंभ

कोल्हापूर : केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या संकल्पनेतून भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती होणेच्या उद्देशाने दिनांक 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात “सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्र समृध्दी”…

प्रकाशआण्णा आवाडे , राहुल आवाडेंनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट

कोल्हापूर : इचलकरंजी येथील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची आमदार प्रकाशआण्णा आवाडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व डॉ.…

सांगरुळात महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातील सांगरुळ पंचायत समिती महाविकास आघाडीचा भव्य कार्यकता मेळावा महाविकास आघाडीचे करवीरचे उमेदवार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ हॉल (सांगरुळ) येथे उत्साहात संपन्न…

कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांनी घेतली आ. सतेज पाटलांची भेट

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर चा महाविकास आघाडीही उमेदवार कोण असेल याचे उत्तर शनिवारी रात्री समजले. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार कोण या प्रश्नाचे उत्तर देत काँग्रेस पक्षाने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर…

म्हाकवे गावातील शेकडो नागरिकांचा घाटगेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे ,पक्षांतराचा सिलसिला चालूच आहे. कागल तालुक्यातील म्हाकवे गावातील दत्तात्रय बंडोपंत पाटील आणि विजय बंडोपंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी समरजीत घाटगे यांच्या उपस्थितीत…

🤙 8080365706