उंचगाव येथे अपघातात एक ठार

गांधीनगर (प्रतिनिधी) : उंचगाव येथील पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेली माहिती…

समरजित घाटगे यांच्या समर्थकांकडूनचं निराधारांची लूट-प्रताप उर्फ भैय्या माने

कागल (प्रतिनिधी) : समरजित घाटगे यांच्या समर्थकांकडूनच निराधार योजनेतील वृद्ध लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे असा पलटवार केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केला आहे. कागलमध्ये झालेल्या…

खा.धनंजय महाडिकांची ठाकरे पितापुत्रांवर टीका  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी आकांडतांडव करून त्याचे खापर शिंदेफडणवीस सरकारवर फोडण्याचा ठाकरे पितापुत्रांचा प्रयत्न हा महाराष्ट्रातील गुंतवणूक रोखण्याचा आणि नव्या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी संभ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे खासदार धनंजय  महाडिक  यांनी केला आहे. वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे ठाकरे सरकारचे अपयश उघडकीस येऊ नये, यासाठी उलटा कांगावा करण्याचा प्रयत्न पुरता फसल्यानंतर आता महाराष्ट्राशी कोणताच संबंध नसलेल्या उद्योगांची खोटी यादी पुढे करून  जनतेच्यामनात संशय निर्माण करण्याचे उद्योग ठाकरे पितापुत्रांनी सुरू केले आहेत. प्रत्यक्षात ज्या उद्योगांशी महाविकासआघाडी सरकारच्या काळात ठाकरे यांनी साधी चर्चादेखील केली नव्हती, सामंजस्य करारही झाला नव्हता, किंवा सरकारमार्फत कोणताही पत्रव्यवहारदेखील झाला नव्हता, अशा उद्योगांची खोटी यादी पुढे करून एक अपप्रचाराचे टुलकिट तयार करण्याचा या पितापुत्रांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीस आणि उद्योगस्नेही वातावरणास अडसर निर्माण करणाराच आहे असा गंभीर आरोपही खासदार महाडिक यांनी केला.  अविश्वासाने आणि जनादेश लाथाडून अभद्र आघाडीद्वारे गैरमार्गाने मिळविलेली सत्ता अडीच वर्षांत गमावल्याच्या संतापातून ठाकरे पितापुत्रांचा हा थयथयाट सुरू असून, याचा सूड महाराष्ट्रावर उगवण्यासाठी राज्यातील गुंतवणुकीत अडसर  उभे करण्याचा भयंकर कट रचला जात आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. कोविड काळात ठाकरे सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक नमुने जनतेनेप्रत्यक्ष अनुभवले आहेत. जुलमी, एककल्ली, हेकेखोर, आणि कायदा गुंडाळून ठेवत जनतेला वार्‍यावर सोडणार्‍या आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेऊन कॉंग्रेसी राजवटीत नेले. मात्र, आता अशा  कटकारस्थानांना केराची टोपली दाखवून राज्याला वेठीस धरणाऱ्यांना  जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.  ठाकरे सरकारशीसंबंधित असलेल्यांच्या भ्रष्टाचाराचे भयंकर नमुने आता उजेडात येऊ लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या आणि देशद्रोह्यांना साह्य केल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खावी लागलेल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणखी काही बोलभांड नेत्यांना गजाआड जाण्याच्या भीतीने घाम फुटला असून त्या भीतीपोटीच हे आकांडतांडव सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

अपघातातील मृत वारकऱ्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार      

कोल्हापूर (प्रतिनिधी) :मिरज-पंढरपूर महार्गावर जुनोनी (ता.सांगोला) येथे काल (सोमवारी) निघालेल्या पायी दिंडीत भरधाव कार घुसल्याने झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा मृत्यू झाला. या सात पैकी पाच जणांवर आज (मंगळवारी)…

गोकुळतर्फे ‘गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन-चेअरमन विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी): गोकुळ दूध संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोकुळश्री’ स्पर्धेत जास्‍तीत जास्‍त दूध उत्‍पादकांनी भाग घ्यावा असे आवाहन  चेअरमन विश्‍वास पाटील यांनी केले आहे. सदरची स्‍पर्धा दि.१६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर…

युवराज पाटील यांची समरजित घाटगे यांच्यावर टीका

कागल (प्रतिनिधी) : समरजित घाटगे प्रत्येक गोष्टीसाठी शाहू ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरीत आहेत. त्यांची डिजिटल बोर्ड ही योजना कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या वर्गणीतूनच उभारली जात आहे,असा आरोप गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक…

राजर्षी शाहू भास्करराव जाधव पॅनलचा प्रचार शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज (मंगळवारी) करण्यात आला. या प्रचार शुभारंभावेळी मनोगत भाषणात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष…

‘त्या’ सर्वांची देणी देण्याची जबाबदारी आमची-आ.हसन मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रातिनिधी) : शेतकऱ्यांचे वैभव असलेला गोडसाखर कारखाना कामगारांनी जीवापाड जपला आहे. कारखान्याच्या सेवेत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचीही सर्वच देणी देण्याची जबाबदारी आमची आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ…

२५ हजारांची लाच घेताना शिक्षणाधिकारी किरण लोहार जाळयात

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले.…

भीषण अपघातात कोल्हापूरच्या ७ जणांचा मृत्यू

पंढरपूर (प्रतिनिधी): मिरज-पंढरपूर महामार्गावर जुनोनी येथे पायी दिंडीत कार घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर,६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील…

🤙 8080365706