महसूल मंत्री .चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

कोल्हापुर: महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. यावेळी, नागरिकांचे प्रश्न, अडीअडचणी समजून घेऊन काम करा, तसेच, महसूल संहितेचे पालन करून. जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अधिकाराचा वापर करा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

 

 

महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी, भूमी अभिलेख विभागाची आढावा बैठक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात पार पडली. बैठकीपूर्वी विविध विषयांशी संबंधित 750 हून अधिक निवेदने त्यांनी स्वतः स्वीकारुन नागरिकांशी संवाद साधला.

 

बैठकीच्या सुरुवातीला वनपट्टा धारक शेतकऱ्यांना 7 ई व 12 ई चे वाटप, पूरग्रस्तांना वाढीव गावठाणातील भूखंड वाटप, चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम सातबारा वाटप, पन्हाळा तालुक्यातील कसबा सातवे व मौजे कोडोली येथील गावठाणवाढ भूखंड शर्तभंग नियमानुकूल आदेशाचे तसेच अन्य लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी  आमदार अमल महाडिक,राहुल आवाडे, अशोकराव माने, शिवाजी पाटील, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जॅसमिन, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, तसेच प्रांत, तहसीलदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706