कोल्हापूर:राजर्षी शाहूंच्या ऐतिहासिक कलानगरीत गणेशोत्सव शिस्तबद्ध, भव्य आणि सामाजिक सलोख्याने साजरा व्हावा, या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमिती’च्या भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून सामाजिक एकता, परंपरा आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणून प्रशासकीय व सामाजिक प्रश्न सुलभतेने सुटावेत आणि शहरात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, हा या महासमितीचा उद्देश अत्यंत कौतुकास्पद आहे.
यावेळी खासदार शाहू महाराज, खा.धनंजय महाडिक,आमदार राजेश क्षीरसागर, महापौर . रूपाराणी निकम, माजी आमदार जयश्री जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सुजित चव्हाण, राहुल चिकोडे यांच्यासह कोल्हापुरातील तालीम संस्था व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
