गडहिंग्लज:दुग्धव्यवसायातील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘गोकुळ’च्या राजकारणाला यंदा चांगलीच उकळी फुटल्याची चिन्हे आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी ‘गोकुळ’च्या कारभाराबाबत थेट भूमिका मांडल्याने या राजकारणाला नवा वळण मिळाला आहे.

तीनही तालुक्यांना प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा, इच्छुकांची वाढलेली संख्या आणि आमदार यांच्याविरोधात तयार होत असले राजकीय समीकरण यामुळे ‘गोकुळ’चे राजकारण चांगलेच दबकून निवडणुकीकडे वाटचाल करत आहे.
‘गोकुळ’च्या मागील संचालक मंडळात गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्याला प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. आजरा तालुक्यातून एकमेव संचालक होता. त्यामुळे यंदा तीनही तालुक्यांतील इच्छुकांची संख्या वाढल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
गडहिंग्लजमधून सतीश पाटील, प्रकाश चव्हाण, सोमराज आबळे, शिवराज हरगुडे, तानाजी कुपेकर, संजय वडकत्ती हे इच्छुक आहेत. आजरातून अंजनाताई रेडेकर यांच्यासह अशोक चरती, सस्तोबा घुर्गे यांच्याही नावांची चर्चा आहे. चंदगडमधून माजी आमदार राजेश पाटील, दिपक पाटील आणि शांताराम पाटील इच्छुक आहेत.
आ. शिवाजी पाटील यांनी ‘गोकुळ’च्या कारभाराबाबत थेट भूमिका मांडल्याने या विषयाला राजकीय रंग मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत फक्त संचालकपदाची निवडणूक न राहता, जिल्ह्यातील राजकीय वजनही पणाला लागणार आहे, अशी चर्चा आहे.
_दिनांक: 12 ऑगस्ट 2026_
