सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू ; गडचिरोलीतील हृदय द्रावक घटना

कोल्हापूर: गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जप्तनाई येथील अनुदानित आश्रमशाळेत हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून तिघींवर उपचार सुरू आहेत.

 

मृत विद्यार्थिनींची नावे:
1. दीपिका लकडा – १२ वर्षे
2. सुष्मिता मंडल – १४ वर्षे
3. अनु कोरेटी- ८ वर्षे

पलंग नसल्यामुळे विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या होत्या. त्याचवेळी साप चावल्याने ही दुर्घटना घडली. गंभीर असलेल्या एका विद्यार्थिनीला एअर लिफ्ट करून नागपूरला हलवण्यात आले आहे. उर्वरित दोघींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना घडली तेव्हा आश्रमशाळेत पलंग नव्हते. दीपिकाची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलवण्यात आले आहे. इतर १५ विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती उपप्राचार्यांनी दिली.

निष्काळजीपणा आढळल्याने आश्रमशाळेच्या अधीक्षक माधवी चिनमवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन SOP तयार करण्यात येणार आहे.
मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त अँड. आशिष जयसवाल यांनी दिली.

 

🤙 8080365706