कोल्हापूरच्या सुर्वेनगरमध्ये जिलेटिनने बंगला उडवला, मिळकतीच्या वादाची शक्यता, शेजारील घरेही हादरली

कोल्हापूर : कळंबा रिंगरोड परिसरातील सुर्वेनगर येथे जिलेटिनच्या कांड्याचा वापर करून स्फोट घडवून बंद बंगला उडवण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडला. या भीषण स्फोटात शेजारील तीन घरांच्या खिडक्या फुटल्या असून नुकसान झाले आहे.

 

 

 

मिळकतीच्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

 

माहिती अशी की, सुर्वेनगर येथील रणनवरे कॉलनी येथे शशिकला वासुदेव बोईजेकर यांचा बंद बंगला आहे. त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्याने कळंबा रिंगरोडवरील केएफसीजवळ प्रज्वल पवारच्या नावावर बंगला केल्याची चर्चा सुरू होती.

 

स्फोटामध्ये बंगल्याच्या दोन खोल्या आणि तीन भिंती कोसळल्या. शेजारील जी. डी. पाटील, आर. डी. कुमार आणि जिरगे यांच्या घरांच्या खिडक्यांचे काचा स्फोटात फुटल्या. तसेच कुमार यांच्या सोलरवरही नुकसान झाले.

 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. जिलेटिन कोणी आणि कशासाठी आणले याचा शोध घेतला जात आहे.

 

 

🤙 8080365706