सुळकुड येथे विद्यार्थ्याचा विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन मृत्यू; खेळताना घडली दुर्दैवी घटना, परिसरात हळहळ 

कोल्हापूर : सुळकूड ता. कागल येथे बांधकाम सुरू असलेल्या टेरेसवर खेळताना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने शर्विल महादेव सागर वय 9 या विद्यार्थ्याचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला. 

 

ही घटना सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. मित्रांसोबत खेळताना शर्विलला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाला आणि तो जागीच बेशुद्ध पडला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने कागल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

कोण होता शर्विल?

शर्विल हा कुमार विद्यामंदिर सुळकूड शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. बोलका आणि मनमिळावू स्वभावाचा असलेल्या शर्विलच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बातमी समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी कसबा सांगाव पोलीस ठाण्यात नोंद घेऊन पुढील तपास सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून चौकशी केली जाणार आहे.

 

 

🤙 8080365706