मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा प्रीमियर पार पडला

मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  मुंबई येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा प्रीमियर पार पडला.

 

 

वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतांचा वैचारिक वारसा आणि पंढरपूर वारीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सुमारे 22 मिनिटांचा हा माहितीपट मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये तयार करण्यात आला असून डिस्कव्हरी नेटवर्कच्या 9 वाहिन्यांवर त्याचे प्रसारण करण्यात येणार आहे.

 

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706