कोल्हापूर :महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने आज पोलिस अधीक्षक, कोल्हापूर यांना निवेदन सादर करून सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका पॉडकास्टमध्ये करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनामध्ये संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच घटनेचे कार्यक्षेत्र अन्यत्र असल्यास झिरो एफआयआर (Zero FIR) नोंदवून संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच समाजात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र संघर्ष समितीचे शहराध्यक्ष फजल मुजावर, शहर सचिव आरिफ मुल्लाणी, शहर कार्याध्यक्ष उमर मुजावर, नौशाद मानेर, मौलाना अझहर सय्यद (अध्यक्ष, जमीयत उलेमा-ए-हिंद, कोल्हापूर), इम्रान सनदी (AIMIM), हातकणंगले तालुका अध्यक्ष सलमान नाईकवडे, तालुका कार्याध्यक्ष शरीफ सुतार, तालुका उपाध्यक्ष हाफिज अब्दुल बेपारी, तालुका सचिव अब्दुलगफ्फूर शेख, मौलाना इरफान (हातकणंगले), लियाकत जमादार, सूरज महालदार, जावेद बरगीर, अलाउद्दीन फकीर, शाहरुख पटेल, जमीर नदाफ व जमीर डोंगरी उपस्थित होते.
