उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द;ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द,

कोल्हापूर:पेपरफुटीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाणे परिसरातून प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतला. या घटनेमुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांचा हिरमोड झाला असून, अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांकडे जाण्याची तयारी करत असतानाच त्यांना परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळाली.

टीईटी परीक्षा ही शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक उमेदवारांनी महिनोनमहिने अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली होती. मात्र, पेपरफुटीच्या संशयामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

 

 

🤙 8080365706