कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक आदिल फरास, अपर जिल्हाधिकारी अजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
०००००
