कोल्हापूर शहरामध्ये 13 जून पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

कोल्हापूर : अलनिनो च्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी कमी झाली आहे. तसेच काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा बंद झाल्याने या योजनेतून शहराला पाणीपुरवठा करणे सध्या शक्य होत नाही.

या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आगामी पावसाची शक्यता तसेच पंचगंगा नदीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन या तिन्ही पंपिंग स्टेशनच्या क्षमतेनुसार पाणी उपसा करण्यात येणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन व काटकसरीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर शहर तसेच संलग्न उपनगरांमध्ये दि. 13 जून 2026 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

 

चंबुखडी वरून वितरित होणारा शहरातील भाग खालील प्रमाणे

 

शनिवार दिनांक 13.06.2026

 

रोजीपासून एक दिवस आड पाणी पुरवठा होणारे भाग

 

रविवार दिनांक 14.06.2026 रोजीपासून एक दिवस आड पाणी पुरवठा होणारे भाग

 

Ø आझाद गल्ली, मटन मार्केट, लक्ष्मीपुरी , शाहूपुरी 5, 6, 7, व 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाषरोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, खानविलकर पेट्रोल पंप, अकबर मोहल्ला, बाराइमाम, भवानी मंडप मिरजकर तिकटी, महालक्ष्मी नगर, टेंभी रोड , इत्यादी

 

Ø फुलेवाडी रिंगरोड, नृसिंह कॉलनी,गंगाई लॉन, भोगम पार्क,फुलेवाडी 1 ला ते 6 वा बस स्टॉप व सलग्नित ग्रामीण भाग

 

Ø महाद्वाररोड , तटाकडील तालीम , चंद्रेश्वर, संख्या मठ , फुलेवाडी, रंकाळा टॉवर , शिवाजी पेठ काही भाग, गुजरी , गंगावेश, दुधाळी, पंचगंगा रोड, पापाची तिकटी, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, , सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, उत्तरेश्वर , लक्षतीर्थ, बलराम कॉलनी इत्यादी, सानेगुरुजी,राजेसंभाजी नगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटील, तुळजाभवानी, राजोपाध्येनगर

 

पुईखडी फिल्टर हाऊसवरुन वितरण होणारा शहरातील भाग

 

Ø संपुर्ण राजरामपुरी व एक्सटेंशन परिसर, मातंग वसाहत,राजेंद्रनगर,वैभव टेकडी, ग्रीन पार्क, रेव्हेन्यू सोसा, सम्राटनगर, शास्त्रीनगर,राजारामपुरी,कावळा नाका, टाकाळा, शिवाजी पार्क, शाहुपूरी, व्यापारी पेठ 1 ली ते 4 थी गल्ली, साईक्स एक्सटेंशन

 

Øजवाहर नगर,सुभाषनगर, वायपी पोवार नगर,एस.एस.सी.बोर्ड, मनोरा हॉटेल, जिवबा नाना, बापुराम नगर, नवीन वाशी नाका, साळुंखे नगर, संभाजीनगर, मोरे माने नगर, कळंबा फिल्टर हाऊस, तपोवन, पाचगांव,जरगरनगर, वारेवसाहत, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, आयसोलेशन इत्यादी

 

कसबा बावडा फिल्टर हाऊसवरुन वितरण होणारा शहरातील भाग

 

Ø भगवा चौक, संपुर्ण बावडा, मधुमालती कॉलनी, डी.वाय.पाटील रोड, बिरंजे पाणंद, कदमवाडी, चौगुले गल्ली,उलपे मळा, कनाननगर, पोवार मळा, रमण मळा, न्यु पॅलेस, धैर्यप्रसाद, कारंडे मळा, सर्किट हाऊस, ताराबाई पार्क,लाईन बाजार,सदर बाजार, विचारे माळ इत्यादी

 

Ø कावळानाका, टेंबलाईवाडी,स्टेशन रोड, बापट कँप,लोणार वसाहत,रुईकर कॉलनी,रुक्मीणी नगर, मार्केट यार्ड

 

, लिशा हॉटेल,जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत,बाबर हॉस्पीटल, शिवाजी पार्क, इत्यादी

तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा पाण्याची नासाडी टाळावी तसेच महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

🤙 8080365706