कागल :जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या उपक्रमांतर्गत कारखाना कर्मचारी कॉलनी परिसरात वड, पिंपळ, करंज, कडुलिंब, बहावा यांसारख्या औषधी व पर्यावरणपूरक देशी वृक्षांची रोपे लावली.
यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि हरित परिसर निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम राबवून हरित उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्यात आली.
