स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांचे श्रेय नाकारून धैर्यशील देसाई यांनी त्यांचा अपमान करू नये          गोकुळ दूध संघाच्या संस्था प्रतिनिधींचे प्रसिद्ध पत्रक             दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांचे कौतुक करू नका*        

कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या दूध विक्रीसाठी मुंबई महानगर ही मुख्य आणि मोठी बाजारपेठ आहे. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या महाकाय शहरात संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री. आनंदराव पाटील- चुयेकर यांनीच “गोकुळ दूध” हा ब्रँड मोठ्या परिश्रमाने प्रस्थापित केला. याचे सगळे श्रेय निर्विवादपणे त्यांनाच जाते. दरम्यान; धैर्यशील देसाई यांनी चापलूसगिरी करायच्या नादात हे श्रेय दुसऱ्या कुणालातरी देऊन स्वर्गीय कै. आनंदराव पाटील- चुयेकर यांचा अपमान करू नये, असा सल्ला श्री. शिरीष देसाई रा. पट्टणकोडोली, श्री. पंडितराव केणे- रा. गंगापूर, श्री. शिवाजी देसाई- रा. भामटे, श्री. सुनील पाटील- रा. ठिकपुर्ली, श्री. अशोक पाटील- रा. कुंभारवाडी, श्री. उत्तम पाटील -रा. वाशी या गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या संस्था प्रतिनिधींनी दिला आहे.

 

 

 

 

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या अनेक संस्थांचे प्रतिनिधी गेल्या महिनाभरापासून मुख्य प्रशासकांकडे वेगवेगळ्या माहित्या मागत आहेत. वास्तविक; गोकुळ दूध संघाचे माजी संचालक या नात्याने श्री. धैर्यशील देसाई यांनी खालील मुद्द्यांची उत्तरे द्यायला हवी होती. ते मुद्दे असे,

 

□ गोकुळ दूध संघाच्या मुंबई येथील कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोरेज, पुणे येथील गोकुळ मिल्क सप्लायर या वितरणाच्या ठेक्याबाबत तसेच; पुणे येथील गायत्री कोल्ड स्टोरेज या पॅकिंग ठेक्याची सविस्तर माहिती.

 

□ गोकुळ दूध संघाच्या दुधाची मुंबई व पुणे येथे वाहतूक करणाऱ्या “मे. व्यंकटेश्वरा गुड्स मुव्हर्स” या कंपनीच्या ठेक्याची माहिती.

 

□ गोकुळ दूध संघात सन २०१६ ते सन २०२१ या काळात झालेल्या नोकरभरतीमधील प्रचंड आर्थिक गैरव्यवहाबाबत.

 

जरूर तिकीट मिळवा……!

पत्रकात म्हंटले आहे, धैर्यशील देसाई यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जरूर तिकीट मिळवावे. परंतु; त्या नादात गोकुळ दूध संघ वाढवण्यासाठी अहोरात्र घाम गाळून कष्ट करणाऱ्या आणि रक्त आठवणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांचे तरी कौतुक करू नका. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे योगदान नाकारून त्यांचा अवमान करू नये.

🤙 8080365706