साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

कोल्हापूर : आजच्या काळात बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यतेलांमध्ये रिफायलिंग केमिकल प्रोसेसिंग आणि भेसळी बाबत ग्राहकांमध्ये चिंता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत संजीवनने ग्राहकांसाठी नैसर्गिक, शुद्ध आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून आपले प्रीमियम कुकिंग सादर केले आहे. अशी माहिती साई जीवन ऑइलचे सर्वेसर्वा उत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रंजीत जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना उत्तम जाधव यांनी एक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या आमच्या संजीवन मध्ये आम्ही नैसर्गिक पद्धतीने मोहरी, डाळिंब,तीळ, जवस, सूर्यफूल, करडई, शेंगदाणा, आणि खोबऱ्यापासून खोबरेल तेल अशा विविध पद्धतीचे तेल तयार करत आहोत यासाठी लागणाऱ्या सर्व मशनरी या ठिकाणी आम्ही उभ्या केल्या असल्याचे सांगितले.
साईजीवन ऑइल हे नैसर्गिक हायड्रोलिक कोल्ड- प्रेस्ड तंत्रज्ञाने तयार केले जाते ज्यामुळे तेलातील नैसर्गिक पोषक घटक चव आणि सुगंध कायम राहतो कोणतेही रसायन कृत्रिम मिश्रण किंवा अनावश्यक प्रोसेसिंग न करता तयार केलेले हे तेल आज आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांची पहिली पसंती बनत असल्याचे उत्तम जाधव म्हणाले.

 

साईजीवन ऑईलची खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कोणतीही भेसळ किंवा मिश्रण नाही कोणतेही केमिकल वापरलेले नाही इतर तेलांच्या तुलनेत कमी वापरात अधिक चव आहे. नैसर्गिक विटामिन ई मुफा आणि पूफासारखे पोषक घटक यामध्ये आहेत. शिवाय शुद्ध स्वाद नैसर्गिक सुगंध आणि उत्तम कुकिंग अनुभव यात आहे.
आज ग्राहक केवळ तेल विकत घेत नाही तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची निवड करत आहेत, साईजीवन ऑइल हे शुद्धता विश्वास आणि आरोग्य यांचे प्रतीक आहे.आमचे ध्येय प्रत्येक घरापर्यंत नैसर्गिक आणि सुरक्षित तेल पोहोचणे हेच असल्याचे उत्तम जाधव म्हणाले.साईजीवन ऑइल महाराष्ट्रातील ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळवत असून येत्या काळात संपूर्ण राज्यभर वितरण,विस्तार आणि नेटवर्क अधिक मजबूत करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे उत्तम जाधव यांनी विश्वास व्यक्त केला.

🤙 8080365706