मुंबई:आमदार सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत सवाल
कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे. असा प्रश्न विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.

कोल्हापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्याऱ्यांची पदे रिक्त असल्याची बाब डिसेंबर, २०२५ मध्ये निदर्शनास आली या रिक्त पदांमुळे बनावट, कालबाह्य औषधे, साठेबाजी आणि नियमबाह्य व्यवहार वाढले आहेत. जिल्ह्यात औषध तपासणीची यंत्रणा अपुरी असून प्रभावीपणे कार्यवाही करण्यास मर्यादा येत आहेत. याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले सदर विभागाच्या नियंत्रणाखाली डॉक्टर, घाऊक औषध वितरक, किरकोळ औषधे, रक्तपेढ्या, अॅलोपॅ चीक आयुर्वेदिक औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्या आदी घटक येत असून त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी औषध निरिक्षकावर असते. पण अपुऱ्या पदांमुळे कर्मचाऱ्यांच्या कामावर ताण पडत असून मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरी
