वादातून दोस्त बनले पक्के वैरी, एकाचा गेला बळी एकमेकांवर हल्ला; एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

इचलकरंजी:तारदाळ (ता. हातकणंगले)
जावीद मुजावर येथील मुख्य चौकात जुन्या मित्रांत पूर्वीच्या किरकोळ वादातून
एकमेकांवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला,
तर दुसरा जखमी झाला आहे. जावीद रशीद मुजावर (वय २२, रा. संगमनगर-तारदाळ)
यश गायकवाडअसे खून झालेल्याचे नाव आहे. यश तानाजी गायकवाड (१९, रा. तारदाळ) असे जखमीचे नाव आहे.
त्याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची नोंद करण्याचे काम रात्री शहापूर पोलिस ठाण्यात सुरू होते.
जावीद व यश हे दोघे पूर्वी एकमेकांचे चांगले मित्र होते. आठ महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळातून दोघांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यानंतर जि. प.
निवडणुकीतही दोघे वेगवेगळ्या पक्षांतून कार्यकर्ते म्हणून प्रचार करीत होते. त्यावेळीही किरकोळ वाद झाला. त्यातून दोघांच्यात खुन्नस वाढत गेली.
तारदाळ यात्रेपूर्वी या दोघांच्यात वाद झाला होता.
वाद विकोपाला जाण्यापूर्वीच काहींनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. सर्व काही मिटल्यासारखे
असताना सोमवारी दोघांत पुन्हा वाद झाला व एकाचा जीव गेला. आरोपी
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तारदाळ गावातील नागनाथ मंदिर या
मुख्य चौकात असलेल्या एका पानपट्टीसमोर जावीद व यश यांच्यात सोमवारी
सायंकाळी वाद झाला. दोघांत जोरदार झटापट सुरूझाली. त्यात यश याच्या हाताला घाव बसला. झटापटीत त्याने जावीदवर सपासप वार केले.
जखमी अवस्थेत जावीद हा जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून २०० मीटर अंतरावर असलेल्या गणेशमंदिर परिसरात मोकळ्या जागेवर गेला.
त्यापाठोपाठ यशही त्याचा पाठलाग करत तेथे जाऊन पुन्हा त्याच्यावर वार केला. या घटनेत जावीद याच्या छातीवर, मानेवर, पोटावर वार झाल्याने तो जागीच कोसळला.
गंभीर जखमी अवस्थेत जावीद याला ग्रामस्थांनी उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले
. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

🤙 8080365706