गडहिंग्लज तालुक्यात पोलिसांनी केला साडेनऊ किलो गांजा जप्त…

गडहिंग्लज :तालुक्यातील निलजी येथे ऊस आणि गहू पिकात लावण्यात आलेला सुमारे ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा ९ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा गडहिंग्लज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयीत मल्लिकार्जुन कल्लाप्पा वाळकी (वय ६५, रा. निलजी) याला पोलिसांनी गजाआड केले आहे.

 

 

 

गडहिंग्लज संकेश्वर मार्गावरील निलजी गावच्या हद्दीत गांजा लागवड झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांना मिळाली होती. याची माहिती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी याप्रकरणी कारवाईसाठी पथक तयार

गडहिंग्लज पोलिसांची कारवाई; संशयीत गजाआड

करून शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास मल्लिकार्जुन वाळकी यांच्या शेतजमीन गट क्रं. ४२६ येथे धाड टाकली. या जमिनीत ऊस आणि गहू पिकाच्या सरीत गांजाची लागवड केली होती. कारवाई करत ९ किलो ५०० ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी मल्लिकार्जुन वाळकी याला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कोणास विकला जाणार होता? या साखळीत आणखी कोणाचा सहभाग होता? याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत

🤙 8080365706