कोल्हापूर :जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी सदस्य अरुण मारुती जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवसेना व शाहू आघाडीच्या सदस्यांची संयुक्त बैठक सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीत जिल्हा परिषदेमधील आगामी राजकीय भूमिका, विकासकामे आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुती यावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते.

जिल्हा परिषदेत शिवसेनेचे ९ सदस्य व शाहू आघाडीचे ४ सदस्य आहेत. शिवसेनेच्या सदस्यांमध्ये इंद्रजित वसंत पाटील (वडणगे करवीर), वर्षाराणी अरुण पाटील (कोतोली-पन्हाळा), रोहिणी अर्जुन आबिटकर (पिंपळगाव-भुदरगड), अर्चना कल्याण निकम (आकुर्डे भुदरगड), सारिका यशवंत नांदेकर (कडगाव-भुदरगड), अरुण मारुती जाधव (कसबा वाळवे-राधानगरी), वर्षा अविनाश सावर्डेकर (आळते हातकणंगले), अतिश नंदकुमार शिंगे (रुकडी-हातकणंगले) आणि शिवाजी मुरलीधर जाधव (रेंदाळ
हातकणंगले) यांचा समावेश आहे. शाहू आघाडीचे अमोल दादासो चव्हाण (उदगाव शिरोळ), प्रचिता चंद्रकांत कोळी (नांदणी-शिरोळ), श्रद्धा अविनाश गायकवाड (अब्दुललाट-शिरोळ) आणि उत्तरा विजीत शिंदे (दत्तवाड-शिरोळ) हे चार सदस्य आहेत.
जाध
